या बाबत सविस्तर वृत्त असे की , शहिद पत्नी श्रीमती कल्पना अंबादास पवार यांनी कारेगाव ता. शिरुर येथे गट नंबर २९८/१ या २ गुंठा क्षेत्रात २००० चौरस फुटाचे दोन मजली आर.सी.सी. बांधकाम करायचे ठरविले होते. या बाबत त्यांच्या परिचयाचे प्रकाश हांडे यांनी बांधकाम व्यावसायिक संतोष जगदाळे यांच्या शी भेट घालून सदर बांधकाम मटेरियल सहित ४४ ,४०,०००/- ला करुन देण्याचे ठरले. त्या बदल्यात ३, ००, ००० रुपये आगाऊ रक्कम घेण्यात आली होती. या नंतर शहिद पत्नी श्रीमती कल्पना अंबादास पवार यांनी संतोष जगदाळे यांना काम कधी सुरु करता या बाबत फोन केला असता लाँकडाऊन आहे. कामगार गावाला गेले आहेत. असे उत्तर दिले. नंतर परत संर्पक साधला असता या ठेकेदाराने काम करण्यासाठी व पैसे देण्यासाठी टाळाटाळ करु लागला होता.
संबंधित ठेकेदार संतोष जगदाळे याने मार्च २०२० पासुन काम तर केले नाहीच ऊलट अँडव्हान्स घेऊन ही उडवा उडवी ची उत्तरे व टाळाटाळ होत असल्यामुळे


