March 30, 2026
लोणी काळभोर प्रतिनिधी
     कुंजीरवाडी:- (ता.हवेली)अहिल्या माता शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने 2023 चा राज्यस्तरीय आदर्श युवा उद्योजक गुणगौरव पुरस्कार साठीची निवड प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते -पांडुरंग रघुनाथ आंबेकर आदर्श युवा उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे,

भारतामध्ये कामगार वर्गाप्रमाणेच उद्योजक ही मोठ्या प्रमाणात निर्माण व्हावेत. यासाठी अहिल्यादेवी माता शिक्षण प्रसारक मंडळ नेहमीच प्रेरणा देत असते. असे कुंजीर लॉन्स, कुंजीरवाडी येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील बोलत होते. उद्योजकांमुळे भारताचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त उद्योजक तयार व्हावेत व चीन पेक्षाही आपण पुढे जाऊ अशी नक्कीच मला खात्री आहे.