March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
             मराठा आरक्षणासाठी सगेसाेयरीची अंमलबजावणी ३० जून पूर्वी करा अशी आग्रही मागणी करत या प्रश्‍नी १३ जुलै पर्यंत राज्‍य सरकारने ठाेस असा निर्णय घ्‍यावा, अन्‍यथा यापुढे सरकारचे ऐकणार नाही.सरकारने एक महिन्‍यात निर्णय न घेतल्‍यास निवडणुकीत उतरणार, यावेळी नाव घेवून उमेदवार पाडू, असा इशारा आज मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना दिला आहे. तसेच त्‍यांनी १३ जुलैपर्यंत आपले बेमुदत उपाेषण ही स्‍थगित केले आहे.

मराठा आरक्षण प्रश्‍नी जरांगे पाटील यांच्‍या बेमुदत उपाेषणाचा आज सहावा दिवस आहे. आज अंतरावली सराटी मध्‍ये मंत्री शंभुराज देसाई यांनी त्‍यांची भेट घेतली. मंत्री शंभुराज देसाई जरांगे-पाटील यांच्याशी बोलत असताना म्हणाले, “दिलेला शब्द पाळणार. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीला आमचा विरोध नाही. पण सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीला घाई नको. उद्या (दि.१४) जून रोजी उपमुख्यमंत्री व सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेणार आहोत. तुमचाही एक प्रतिनीधी पाठवा. पुढे बोलताना ते म्हणाले, आम्हाला दोन महिन्यांचा कालावधी द्या. आचारसंहितेत वेळ गेल्यामुळे थोडे सहकार्य करावे.मंत्री शंभुराज देसाई यांच्या संवादानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले, एक महिन्यात जर निर्णय झाला नाही तर निवडणुकीत उतरणार “आणि कोणीही मराठ्यांच्या दारात यायच नाही. १३ जुलैपर्यंत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.