या पालखी सोहळ्याचे समन्वय डॉ.संदीप महिंद गुरुजी यांच्यासह शिवभक्त यासाठी नियोजन करीत आहेत निपाणी मधील परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी आणि निपाणी येथील सर्व शिवभक्त यांच्या माध्यमातून हे नियोजन निपाणी नगरीत करीत आहे, बुधवार दिनांक 5 जुलै रोजी सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी लढवलेली नेसरीची खिंड येथून निपाणी नगरीमध्ये सायंकाळी 06-30 वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक निपाणी येथे पादुकाचे आगमन होणार आहे तेथून हा पालखी सोहळा तानाजी चौक, कोटीवाले कॉर्नर, कित्तूर राणी चन्नम्मा चौक, धर्मवीर संभाजीराजे चौक,( बस स्टँड) निपाणी येथे या पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे हा पालखी सोहळा निपाणी परिसरासह ग्रामीण भागामधून हरे कृष्णा इस्कॉनचे भक्त, सोंदलगा, शिरगुप्पी, श्रीपेवाडी, कोडणी, भिवशी, बुधलमुख, पांगीर, बुदिहाल, अर्जुनी, रामपूर, चिखलवाळ, यमगरणी, गायकवाड, तवंदी, जत्राट, पडलिहाल, लखमापूर, शेंदूर, येथून भजनी मंडळ या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत हा पालखी सोहळा हा टाळ मृदुंगाच्या गजरात निघणार आहे आणि फिरंगोजी शिंदे सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संचलित मर्दानी आखाडा सैनिक गिरगाव कोल्हापूर यांची मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक या पालखी सोहळ्यास मध्ये दाखवण्यात येणार आहे अशी माहित समाधी मठाचे सागर श्रीखंडे यांनी दिली.
