शिरूर येथील विद्याधाम प्रशालेच्या प्रशस्त सभागृहात शिरूर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने परीक्षा पे चर्चा पर्व-६ अंतर्गत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेऊन नियोजित दिलेल्या दहा विषयांवर रेखाटन करून आकर्षक चित्र रंगवली.स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक: श्रुती गणेश नंदनकर (इयत्ता नववी) आर.एम.डी.इंग्लिश मीडियम स्कूल,शिरूर,द्वितीय क्रमांक: जिनिषा गोरक्ष मलगुंडे (इयत्ता अकरावी), या विद्यार्थिनींच्या बेटी बचाव बेटी पढाओ या विषयांना मिळाला तर तृतीय क्रमांक:धनश्री मुकादम गवांडे (इयत्ता अकरावी) विद्याधाम प्रशाला जुनियर कॉलेज,शिरूर याच्या G-20 जागतिक विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल या विषयावर काढलेल्या चित्राला मिळाला.
या सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते तीन आलेल्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र तर १० उत्तेजनार्थ व २५ विशेष नैपुण्य प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव मारुती कदम,विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य पी.डी कल्याणकर,पर्यवेक्षक एन.एस.देवळालीकर,विस्तार अधिकारी वंदना शिंदे,लक्ष्मण काळे, प्रदीप देवकाते, बाबुराव पाचंगे,विजय नरके,रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


