March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
              जेथे आपण आहोत तेथे सकारात्मकतेने काम करा यश आपलेच असते कारण किलबिल शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे आपले पहिले उद्दिष्ट आहे त्या दृष्टीने प्रयत्न केलात तरच समाजाच्या शाश्वत जीवनाचा विकास होईल असे  किलबिल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रफिक सौदागर यांनी केले,

          रामनगर वढू खुर्द (ता हवेली) येथील किलबिल अन्युअल स्कूल ग्यादरिंग 2024  सिद्धेश्वर मंगल कार्यालयात रविवारी  आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते सत्काराला उत्तर देताना  बोलत होते.सौदागर   पुढे ते म्हणाले की शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून भावी पिढी घडविण्याचे काम आपल्या हातून होत आहे त्यामुळे या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून समाजाची बांधिलकी जपणे आपले आद्य कर्तव्य आहे काम करताना वास्तव्याचे भान ठेवा असा सल्ला त्यांनी दिला,

           यावेळी  किलबिल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रफिक भाई सौदागर सरपंच रसिकाताई चोंधे उपसरपंच नवनाथ पवळे रोहिणी ताई भोंडवे विलास खांदवे महेंद्र खांदवे किलबिल शिक्षण संस्थेचे संचालक जाकिरभाई सौदागर फरदीन सौदागर रुबीना मॅडम माऊली चोंधे मुख्याध्यापक नितीन भोसुरे तस्लीम तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा मॅडम यांनी केले व  कार्यक्रमाचे प्रास्ताविक   राजकन्या मॅडम यांनी केले,