March 30, 2026
प्रतिनिधी हवेली 
      लोणीकंद ( ता हवेली ) येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे जरांगे पाटील यांना जाहिर पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज्याच्या वतीने लोणीकंद ग्रामस्थांनी बाजार मैदान या ठिकाणी एकदिवसीय लाक्षणिक अन्नत्याग उपोषण करून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला .

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या पुकारलेल्या लढ्याला  पाठिंबा देण्यासाठी येथील ग्रामस्थांनी एकत्रितपणे बाजार मैदानावर ‘एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे ‘अशा घोषणा देत परिसर दुमदुमून गेला एकदिवसीय लाक्षणिक उपोषण शांततेत पार पडले.