March 30, 2026
लोणी काळभोर-अनिकेत मुळीक 
             तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर, वनविभाग येथील परिसरात प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष मा.श्री.बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जंगली १०ते १२ फुटी कंरज,वड,पिंपळ, कडुनिंब, बकुळ,चिंच अशा जंगली वृक्षांचे रोपण प्रहार जनशक्ती विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष कु.शिवराज मनोजराव काळभोर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.    

या वेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री. अमित जगताप ,प्रहार जनशक्ती विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष कु.शिवराज मनोजराव काळभोर,सिकंदर शेख,सिद्धांत काळभोर, दत्ता रायकर,साहिल झगडे,नानासाहेब देशमुख, जीवन जाधव, तसेच प्रहार जनशक्ती विद्यार्थी संघटना, ग्रीन फाऊंडेशन, विभा गिरिश ट्रस्ट, जनाई शिक्षण संस्था उपस्थित होते.            

अन्न आणि पाण्याशिवाय मनुष्य काही वेळ जिवंत राहू शकतो पण ऑक्सिजन शिवाय माणूस काही मिनिटे देखील जिवंत राहू शकत नाही यावरून कल्पना करावी की ऑक्सिजन आपल्यासाठी किती गरजेचा आहे त्यामुळे झाडांचे महत्व देखील तितकेच गरजेचे आहे.परंतु आली कडे अशा काळामध्ये वृक्षांची संख्या खूपच कमी झाल्याने वातावरणामध्ये ऑक्सिजनची कमतरता देखील भासत आहे या सोबतच अनेक समस्या देखील उद्भवत आहेत जसे की, प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग कमी पर्जन्यमान इत्यादी.पूर्वीच्या काळामध्ये झाडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याने वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण विपुल होते त्यासोबत माणसाला शुद्ध हवा मिळाल्याने माणसाचे जीवन देखील अधिककाळ असायचे. पाऊस देखील खुप मोठ्या प्रमाणात पडायचा व प्रदूषणाचे प्रमाण देखील खूप कमी होते.परंतु आजच्या काळामध्ये प्रदूषण आणि ग्लोबर वार्मिंगचा संभाव्य धोका टाळण्यासाठी वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन आणि वृक्ष संगोपन करून पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन सिकंदर शेख यांनी केले.