March 30, 2026

हवेली ज्ञानेश्वर पाटेकर 

      पुणे: पुण्यामध्ये पुन्हा बोगस एनए ऑर्डर जोडून सदनिकांच्या बोगस दस्त नोंदणीचा आजही धुमाकूळ सुरू असल्याची माहिती स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.    

पुढे बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की मार्च, एप्रिल महिन्यातील एन ए ऑर्डर घोटाळ्यातील प्रकरणांमध्ये अद्याप कोणतेही प्रकारची कारवाई झालेली नाही. पुण्यात बोगस येणे ऑर्डर जोडून आजही बोगस दस्त नोंदणी सुरूच आहे.1 ते 27 मधील सर्व सब रजिस्टर, अधिकाऱ्यांना हाताशी धरून ऑफिस मध्ये राजरोसपणे बोगस  नोंदणी करत आहेत. यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.   

त्वरित कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आहे.