गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांच्या जाणेने भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा तसेच राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, त्यांनी आपल्या जीवनाच्या राजकीय प्रवासामध्ये सुरुवातीला खाजगी कंपनीत नोकरी करत 1973 साली राजकारणात पदार्पण केले तेव्हापासून सुमारे 50 वर्ष राजकारणात आपला दबदबा ठेवला, पुण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ असणारा कसबा पेठ मतदार संघ, तसेच पुण्यामधील इतर मतदारसंघ या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची वाढ करण्यासाठी त्यांनी प्रचंड अशी मेहनत केली आहे, ते 1983 ला पुणे महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून तर त्यानंतर सलग 3 पंचवार्षिक नगरसेवक म्हणून निवडून आले, 1995 पासून ते सलग पाच वेळा आमदार म्हणून तर एकदा खासदार निवडून आले होते, राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदे तसेच पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे, बापट यांच्या जाणेने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये दुःखाचे सावट तयार झाले असून, पक्षांमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे,

