March 30, 2026
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
    नवरात्रोत्सवात हत्यारप्रदर्शन, प्रतिमादहन व मिरवणुकात डीजेला पुर्ण बंदी , वरीष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगीतले .  

शिरूर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील व नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना या उत्सवात पालन करण्या विषयीचे नियमांची माहीती देणेसाठी बोलविलेल्या बैठकीमध्ये पी आय शेडगे यांनी मागे उजेडाअभावी कोंढापुरीत महिलेचे छेडछाडीसारखा अनुचीत प्रकार घडू नये याचीही दक्षता घेण्याचे आवाहन केले . यावेळी तळेगावचे माजी सरपंच पोपट भुजबळ व पोलीस पाटील पांडुरंग नरके यांनी पोतसोहळा मिरवणुक ढोलताशाचे निनादात काढत असलेची माहीती दिली . कोरेगाव भीमा चे माजी सरपंच विजय गव्हाणे व पोलीस पाटील मालन गव्हाणे यांनी दुर्गादौड व मिरवणुक मार्गातील ट्राफीकवीषयी उहापोह केला .

जातेगावच्या पोलीस पाटील इंगवले, वाजेवाडीच्या सोनाली वाजे , करंदीच्या वंदना साबळे, कासारीच्या रुपाली भुजबळ , सणसवाडीचे माजी सरपंच दता हरगुडे, शिवाजी दरेकर , सागर हरगुडे , महादेव हरगुडे , पारोडीचे पो. पाटील कुंडलीक येळे , वरुडेचे भाऊसो शेवाळे, दहीवडीचे जालींदर पवार ‘, मिडगुलवाडीचे राजेंद्र पिंगळे , धानोरे – दरेकरवाडीचे पांडूरंग दरेकर ,हिवरेचे बाबाजान शेख , खैरवाडीचे मंगेश चव्हाण , वढुचे जयसिंग भंडारे , अरणगावचे संतोष लेंडे, धामारीचे आत्माराम डफळ , रोहीत थोरात , अरुण पवार, बालाजी चव्हाण यांनी आपापल्या गावचे उत्सवातील कार्यक्रमांची माहीती दिली . यावेळी पोलीस निरीक्षक अतकरे, पो. नि .स्वामी, पो. नि .खटावकर, पो. नि .माळी , पोलीस पाटील संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष कर्पे, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना अध्यक्ष बाळासो शिंदे व नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधीकारी उपस्थीत होते