सुनील भंडारे पाटील
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास
समाजासमोर जागृत राहण्यासाठी, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित तानाजी सोनवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार
गिरीश बापट यांच्याशी 2/6/ 2022
रोजी लेखी पत्राद्वारे मागणी केली, केंद्र सरकारकडून त्यासाठी सकारात्मक
उत्तर मिळाले,
सोनवणे यांची टपाल
तिकिटावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव, फोटो येण्यासाठी अनेक
दिवसापासून ची धडपड चालू आहे, त्यासाठी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गिरीशजी बापट यांच्याशी लेखी पत्राद्वारे मागणी केली होती, ”
पत्रामध्ये हिंदुस्थानातील तमाम जनतेचे
यांचे स्वराज्याशी असलेले कार्य महान आहे, तसेच त्यांचे आचार विचार आजच्या
समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या महान कार्याचा विचार करून त्यांचे
टपाल तिकीट तयार व्हावे ” असा मजकूर आहे,
या लेखी स्वरूपातील पत्राचा विचार करून पंतप्रधान मोदी यांनी 13/7/2022
रोजी उत्तर दिले, ” तुमची मागणी रस्ता आहे, तुमच्या मागणीचा विचार(पीएसी)
कमिटी मध्ये मांडून त्यावर सखोल विचार केला जाईल, तुम्ही दिलेले लेखी
पत्र आम्हाला पोहोचले, आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यावा ही विनंती ”
असे सकारात्मक उत्तर मिळाले, त्यामुळे आता अमित सोनवणे यांच्या मागणीला
निश्चितच दिशा मिळाली असून, लवकरच आपल्या हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर
श्री छत्रपती संभाजी महाराज आपल्याला टपाल तिकिटावर दर्शन मिळणार आहे,

