कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील ग्राम पंचायतीच्या गलथान कारभाराचा बोजवारा उडाला असून मुख्य चौकात असणारा पथदिवा भरदिवसा सुरू असल्याने. त्यांच्या उदासीन कारभाराचा ग्राम पंचायत लगत असणाऱ्या चौकात दिवसाढवळ्या उजेड पाडला असून याबाबत ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांचे साधे लक्षही नाही,
शिरूर तालुक्यातील कोट्यवधीचे उत्पन्न असणारी सधन ग्राम पंचायत म्हणून कोरेगाव भिमा ग्रामपंचायत आता आपल्या गलथान कारभाराचा मुख्य चौकात व ग्राम पंचायत कार्यालया शेजारी असणाऱ्या मोठ्या पथदिव्याचा प्रकाश दिवसाढवळ्या पडत असून या कारभाराला म्हणावे तर काय ? भर दुपारी सुद्धा कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीचे पथदिवा सुरू असल्याने साधा पथदिवा वेळेवर बंद करण्यासाठी ग्राम पंचायतीला फुरसत नाही काय ? तसेच हे पथदिवे संपूर्ण गावभर चालू असून गावामधील मुख्य गावठाण त्याचप्रमाणे वढू बुद्रुक रस्ता, फडतरे वस्ती तसेच गावातील इतर भाग या ठिकाणी दिवसा देखील लोकांना व वाड्यावस्यांना पथदिवे दिवसादेखील प्रकाश देत आहेत त्यामुळे खूप गंभीर असा प्रश्न उपस्थित होत आहे.
