तळेगाव ढमढेरे येथील आमदार पवार यांची सभा चालू असताना येथील वृद्ध शेतकरी यांनी सभा थोडा वेळ ऐकल्यानंतर या शेतकऱ्याने शिरूर तालुक्यात घोडगंगेच्या प्रश्नावर सभासद व जनता किती वैतागली आहे, या घटनेवरून स्पष्ट झाले, चक्क त्या अंदाजे 70 वर्षाच्या पुढील वय असणाऱ्या शेतकऱ्याने चक्क उसाचे टिपरू उजव्या हाताने बाहेर काढून दाखवला तसेच जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तसेच कामकाजा बाबतीत काही शब्दांचा उद्धार केला परंतु या शेतकऱ्याचा आवाज या ठिकाणी दाबण्यात आला, पोलिसांच्या साह्याने संबंधित शेतकऱ्याला सभेतून बाहेर काढण्यात आले, वास्तविकता अशा स्वरूपाच सभांमध्ये नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असताना या शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याने, या घटनेची सद्यस्थितीत शिरूर तसेच हवेली तालुक्यात जोरदार चर्चा चालू असून घोडगंगेच्या प्रश्नावर शेतकऱ्यांची काय भूमिका असेल याविषयीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे,
