March 30, 2026

अहमदनगर : नगर- औरंगाबाद महामार्गावरील कांगोणी फाटा शिवारात दोन कराची समोरा समोर टक्कर झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.


याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, काल गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेटा कारला समोरुन येणाऱ्या डस्टर कारने हुलकावणी दिल्यामुळे झालेल्या रस्ता अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.