March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
              वढु बुद्रुक, आपटी (तालुका शिरूर) आणि परिसरातील गावांमध्ये शेतातील तसेच बांधावरील आंब्याच्या झाडांना यावर्षी हवामानाच्या असमतोलामुळे आंब्याच्या झाडांना कैऱ्याचं आल्या नाहीत, त्यामुळे या भागातील लोकांना लोणच्यासाठी कैऱ्या व खाण्यासाठी आंबे विकत घ्यावे लागणार आहेत,         

    भीमा नदीच्या काठावर असणारी ही गावे शेतीप्रधान समजली जातात, शेतामध्ये अनेक प्रकारची पिके घेतली जातात, वर्षाच्या चालू हंगामामध्ये शेतात घराजवळ, बांधावर असण्याऱ्या आंब्याच्या झाडांना यावर्षी कैऱ्याच आल्या नाहीत, असे कधी घडलेच नव्हते असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले, वातावरणाच्या बिघाडामुळे आंब्याच्या झाडाला आलेला मोहोर देखील गळून गेला त्यामुळे कैऱ्या लागल्या नाहीत, फळझाडांना अशा प्रकारे फळे न लागणे हा वातावरणामधील खूप मोठा दुष्परिणाम आहे, ही एक प्रकारची निसर्गाची सूचना असल्याचे या भागामध्ये लक्षात येत आहे, कोकणातील आंबा आता बाजारात येऊ लागला आहे, मात्र वढु बुद्रुक, आपटी तसेच परिसरातील गावांमध्ये आंब्याच्या झाडावर वातावरणाचा खूप मोठा परिणाम झाला असून, कैऱ्या न  लागल्याने झाडे वांझोट्या अवस्थेत उभी आहेत, त्यामुळे या भागातील लोकांना आता कैऱ्या व आंबे विकत घ्यावे लागणार आहेत,