March 30, 2026

 हवेली ज्ञानेश्वर पाटेकर 

“ती भक्ती म्हणावी की ओढ विठ्ठलाची
ती शक्ति म्हणावी की हाक विठ्ठलाची
ती तल्लीनता  म्हणावी की उत्साह
ती वारी म्हणावे की सोहळा विठ्ठलाचा”
 
       अशीच तल्लीनता, अशीच भक्ती आणि हरिनामाचा गजर, खांद्यावर भगव्या
पताका, चंदनाचा टिळा आणि गळ्यात टाळ कोणाच्या डोईवर तुळस तर कोणाच्या डोईवर
ज्ञानोबा माऊलींची मूर्ती तर कोणाच्या विठ्ठलाची.
 सर्व मुले सदरा पायजमा धोतर तर मुली नऊवारी साडी मध्ये.
       सुंदरबाई मराठे विद्यालय प्राथमिक विभागात आज 24 जून रोजी मुख्याध्यापक मा.डाळींबकर  यांनी पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते,

 गेनबा सोपानराव मोझे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार रामभाऊ
मोझे  संस्थेचे उपाध्यक्ष  ज्ञानेश्वर मोझे  तसेच शालेय समिती अध्यक्षा मा.
प्रा. अलका पाटील यांच्या शुभहस्ते ज्ञानोबांच्या पालखीचं व विठ्ठल
रुक्मिणी चे पूजन झाले.

    *” विठ्ठल विठ्ठल जय हरी* *विठ्ठल”*  *”
ज्ञानोबा माऊली ज्ञानराज* *माऊली तुकाराम”*
अशा जयघोषाने परिसर दुमदुमून
गेला होता . विद्यालयापासून जवळच असणाऱ्या स्वामी समर्थ मठापर्यंत व
आजूबाजूच्या परिसरात ही विद्यार्थ्यांची आरोग्य दिंडी आयोजित केली होती.यावेळी विद्यार्थ्यांनी “परिसर स्वच्छ ठेवा व रोग राइला दूर पळवा”  *स्वच्छतेचा मनी वसा आरोग्याचा जपूया वारसा” अशा घोषणा देत स्वच्छतेबाबत जनजागृती केली. गणेश
नगर ,सोमनाथ नगर, सुनिता नगर, बिडी कामगार वसाहत, वडगावशेरी परिसरातील
नागरिकांनी या दिंडीस उदंड प्रतिसाद दिला व विद्यार्थ्यांसोबत स्वतः ही
घोषणा देत या दिंडीमध्ये सहभागी झाले. कोणी फुगड्या
तर कोणी झिम्मा घालत विठ्ठल नामाचा जयघोष करत ही दिंडी विद्यालयात परतली
सर्व शिक्षक वृंद या सोहळ्यात सहभागी झाले होते.