लोणी काळभोर अनिकेत मुळीक
दि.१२, सही शिक्का असल्याशिवाय या देशात कोणत्याही कागदाला महत्व नाही. माणूस कितीही स्वच्छ चारित्र्याचा, सत्यवादी, असला तरी त्यावर विश्वास ठेवला जात नाही. मी जीवंत आहे यासाठी बँकेत हजर असून देखील या देशात पेन्शन धारकाला पेन्शन मिळत नाही. परंतू मी जीवंत असल्याचा दाखला हातात असला तरच त्यावर बँका देखील विश्वास ठेवतात. ही आहे या देशाची कार्यप्रणाली. त्यामुळे कागदाला आणि रबरी शिक्याला अनन्य साधारण महत्व आहे.
असं म्हणतात की, अशाच प्रकारचं महत्व शिक्षण क्षेत्रात शिक्षक मान्यतेच्या कागदावरील शिक्याला आहे. मान्यता कशी मिळाली. मागच्या दाराने की पुढच्या दाराने याला महत्व नाही. परंतू मान्यतेच्या कागदाला आणि त्यावरील शिक्याला राज्याच्या आर्थिक कोषागारापर्यंत महत्व आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बनावट मान्यता तयार करणारी भुरट्या भामट्यांची टोळी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी काम करते आहे.
सी ए चे खोटे सही शिक्के करून बनवले स्वतःचे ऑफिस तोतया सी ए विरुद्ध कलम,४२०,४६५,४६७,४७१ तक्रार दाखल केली आहे. तोतया स्वप्निल जगताप ,विनोद घाडगे याचे सांगणेवरुन तुमचे फर्मचे बनावट शिक्के बनविले आहे* व विनोद मला काम आणुन देतो व आम्ही दोघे भागिदारी मधे जगताप अँड घाडगे पाटील असोसिएट सि ए फर्म या नावाने कामे करत आहोत.
फिर्यादी:- अक्षय रामदास कदम, वय ३१ वर्षे, धंदा- सनदी लेखापाल, (सी ए )रा. फ्लट नं.6, श्रियांश पराडाईज, आकाशवाणी इंद्रप्रस्थ सोयायटीचे बाजुला , हडपसर, पुणे कायमस्वरुपी पत्ता. मु.पो. कोलवडी ता. हवेली, हडपसर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.
मी हडपसर येथील पत्त्यावर माझा मित्र उत्पल प्रताप पवार यांचेसह राहणेस आहे. माझे आई, वडील, भाऊ व वहीनी यांचेसह मु.पो. कोलवडी ता. हवेली, जि.पुणे येथे राहणेस आहे.
(सीए ची पदवी घेतली असुन जानेवारी २०१८ पासुन मी अक्षय कदम अँड असोसिट नावाची फर्म असुन सिए रजिस्ट्रेशन नंबर 182482असा आहे
माझे फर्मचे ऑफीस डी.पी रोड, जय मल्हार हॉटेल समोर, माळवाडी, हडपसर, पुणे व दुसरे ऑफिस केसनंद रोड वाघोली तसेच शिक्रापुर येथे सुध्दा ऑफिस आहेत.गेली 4 वर्षापासुन मी काम करतो माझे नाव चांगले प्रसिध्द आहे. काल दि.12 रोजी सकाळी 10.30 वा माझे कार्यालयीन कामकाजासाठी असलेल्या मो.क्र. वर अनोळखी मो. क्र. वरून फोन आला व सदर व्यक्ती ने मी शफिक मुलानी बोलतो व मी स्वप्निल जगताप यांचे मार्फतीने तुमचे फर्म कडुन मागील विवरण वर्ष २०२१- २०२२ चे माझे *स्काय कन्स्ट्रक्शन नावाचे फर्म चा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला आहे* . व सदर फाईल मधील इनकम कंम्पुटेशन चे पेज मला बँकेने मागितले आहे तुमच्या फर्म मधील *स्वप्निल जगताप* यास मी त्याचे फोन वर संपर्क केला मात्र त्याने मी गावी असुन माझा अपघात झाला आहे.
मी पुण्यात आल्यावर तुम्हाला कागदपत्र आणुन देतो त्यानंतर सुध्दा मी त्याला बरेचदा फोन केले मात्र तो माझे फोन घेत नाही म्हणुन मी गुगल वर तुमचे फर्मचे नाव सर्च करुन तुमचा नंबर मिळवला व तुम्हाला संपर्क केला आहे.
प्रत्यक्षात सदर नावाने कोणतीही व्यक्ती माझ्याकडे काम करत नव्हती पंरतु मी मुलानी यांस तसे न भासवता त्याचे कागदपत्र माझे व्हटसअपवर पाठविणेस सांगितले त्याप्रमाणे शफिक मुलानी यानी कागदपत्र माझे व्हटसअप वर पाठविले सदर कागदपत्र मी पाहिले असता कागदपत्राचे पानावर माझे फर्म रजिस्ट्रेशन नंबर असलेला बनावट शिक्का व त्यावर माझी बनावट सही केलेली दिसली त्यानंतर मी माझे क्लायंट लिस्ट चेक केले असता शफिक मुलानी या नावाचा कुठलाही क्लायंट माझ्याकडे नाही व सदर स्काय कन्स्ट्रक्शन नावाचे फर्म चा इन्कम टक्स रिटर्न फाईल माझ्या फर्म कडुन फाईल केला गेला नाही असे निर्दशनास आले. म्हणुन मी शफिक मुलाणी यांना कागदपत्र घेवुन माझे डी.पी रोड,हडपसर येथे ऑफिसमधे बोलावून घेतले व ते आल्यावर त्याचेकडील कागदपत्र चेक केले असता माझी पुर्ण खात्री झाली कि
स्वप्निल जगताप नावाचे व्यक्तीने माझ्या वरील फर्मचे सिए रजिस्ट्रेशन क्रमांकाचे बनावट शिक्के तयार करून त्या सहाय्याने क्लायंटचे बनावट आय टी आर फाईल करून देवुन त्यावर माझे फर्म चा शिक्का मारून त्यावर माझ्या नावाचे आदयाक्षरांची ची खोटी सही करुन माझी, क्लायंटची तसेच शासनाची फसवणुक केली आहे. त्यानंतर मी स्वप्निल जगताप याचे फोनवर संपर्क केला मात्र त्याने माझा फोन उचलला नाही म्हणुन माझा मित्र नामे संतोष जाधव हे स्वप्निल जगताप याचे राहते घरीचे पत्त्यावर मुरुम, सोमेश्वर नगर, वानेवाडी, बारामती येथे गेले व त्याला बोलावुन आणले असता तो आज सकाळी माझे हडपसर येथील कार्यालयात आला मी त्याला बनावट शिक्याबाबत व फर्मचे रजिस्ट्रेशन क्रमांकाचे शिक्याने खोटे आयटीआर फाईल बाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले माझा मिञ *विनोद घाडगे याचे सांगणेवरुन तुमचे फर्मचे बनावट शिक्के बनविले आहे* व विनोद मला काम आणुन देतो व आम्ही दोघे भागिदारी मधे जगताप अँड घाडगे पाटील असोसिएट सि ए फर्म या नावाने कामे करत आहोत.
असे मला स्वप्निल जगताप याने सांगितले त्यावेळी मी त्याचे इमेल आयडी त्याला दाखवण्यास सांगितले असता त्याने मला त्याचे मोबाईल मधील इमेल आयडी दाखविले असता सदर ईमेल मधील कागदपत्रावर माझ्या बनावाट सहया व माझ्या फर्मचा शिक्याचा वापर करून त्यांनी अनेक क्लायंटचा आयटीआर ,जिएसटी फाईल करुन दिलेले दिसले मी त्याला तो कामासाठी वापरत असलेला लॅपटॉप बददल विचारणा केली तेव्हा त्याने उडवाउडवी उत्तरे दिली.
मी स्वप्निल जगताप यांचे विरुध्द तक्रार देत आहे योग्य ती कारवाई व्हावी.पुढील तपास हडपसर ठाण्याचे उपनिरीक्षक सुशील बाळासाहेब दामारे करत आहे.


