सुनील भंडारे पाटील
श्री रामचंद्र कॉलेज इंजिनीरिंग लोणीकंद पुणे व अक्षय ब्लड बँक हडपसर पुणे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात रक्तदान शिबिर आायोजीत करण्यात आले हा कार्यक्रम दिनांक रोजी 25 मार्च 2025 तारखेला श्री रामचंद्र कॉलेज इंजिनीरिंग लोणीकंद येथे आयोजित करण्यात आला होता.
हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज जयंती,छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन व शहीद दिन या निमित्त आयोजित केला होता.ज्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीरिंग संस्थेचे संस्थापक सचिव माननीय शंकर रामचंद्र भूमकर, श्री उद्धव रामचद्र भूमकर खजिनदार , सिद्धांत शंकर भूमकर टेक्निकल कॅम्पस डायरेक्टर,प्राचार्य डॉ. अविनाश देसाई , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी , विद्यार्थी विकास अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मा.डॉ.सायली शिंदे वैद्यकीय अधिकारी यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना रक्तदाना बद्दल माहिती दिली. या शिबिरात अनेक विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्वी हुडे यांनी केले, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी यांनी केले. एकूण 50 हून अधिक विद्यार्थ्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले.
या रक्तदान शिबिर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीरिंग संस्थेचे संस्थापक सचिव माननीय शंकर रामचंद्र भूमकर तसेच प्राचार्य माननीय डॉ. अविनाश देसाई यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सकारात्मक ऊर्जा व प्रेरणादायी विचारांमुळे रक्तदान शिबिर प्रभावीपणे पार पडले.
