कदमवाकवस्ती येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये पहाटे ३ च्या सुमारास ७४ वर्षीय पुरूष रुग्णाला दाखल करण्यात आले. या रुग्णाला अचानक तीन वेळा उलट्या झाल्या. तसेच श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे हाता पायाचे बोटे काळे पडलेले होते. त्यानंतर विश्वराज हॉस्पिटचे डॉ. नामदेव जगताप, आयसीयू विभाग प्रमुख डॉ. विजय खंडागळे आणि आपातकालिन विभाग प्रमुख डॉ. सचिन कातकडे या डॉक्टरांच्या टीम ने व्हेंटिलेटर द्वारे त्या रुग्णाला ऑक्सिजन देण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, रात्री माहिती नसलेल्ेय विष प्राशन केले. त्याच वेळी रुग्णाचा ए बी जी म्हणजेच धमन्यातील रक्ताचे ऑक्सिजनचे प्रमाणाची तपासणी केले. त्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यामध्ये मिथेमोग्लोबिनिया नावाची विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

