March 30, 2026
लोणी काळभोर प्रतिनिधी
            वानवडी पुणे मधील घटना:- फुटबॉल खेळत असताना बॉल झाडांच्या झुडपात गेल्यामुळे ते शोधण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन पाठलाग तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयित आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे पीडित मुलगी २८ आठवड्यांची गर्भवती राहिल्याने वानवडी पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वये तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

             मुकेश कुमार मुखीया (वय २२, कॉलनी, लुल्लानगर, वानवडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत घटनेच्या वेळी अल्पवयीन व सध्या अठरा वर्षाच्या असलेल्या तरुणीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.सहा महिन्यांपूर्वी पीडिता अल्पवयीन असताना ती मित्रांसोबत फुटबॉल खेळत असताना बॉल मैदानाशेजारील झुडपात गेला. त्या वेळी पीडिता बॉल शेाधण्यासाठी झुडपात गेली. त्या वेळी तेथे आलेला मुकेश तिच्या पाठोपाठ झुडपात गेला. तेथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. दरम्यान, पीडिता ही गर्भवती असल्याचा प्रकार तिच्या घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर चौकशीमध्ये तिने मुकेश याने अत्याचार केल्याचे सांगितले. त्याने केलेल्या अत्याचारामुळे सध्या पीडिता ही २८ आठवड्याची गर्भवती असून, आरोपीवर बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

           लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार समोर आल्यानंतर २२ वर्षीय तरुणावर बलात्कार तसेच पॉस्कोच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे वडील लष्करात नोकरीला असून, त्यांची बदली झाल्याने संपूर्ण कुटुंब बिहार येथे गेले आहे. संजय पतंगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी ठाणे.पुढील तपास चालू आहे.