दरवर्षी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने राज्याच्या तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून शंभू भक्त, येत असतात, कार्यक्रमासाठी राज्य मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर आजपर्यंत उपस्थित राहिलेले आहेत, ग्रामस्थांच्या अपेक्षेनुसार या वर्षापासून दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री यांनी उपस्थित राहून समाधीची महापूजा व समाधीवर पुष्पवृष्टीकरण्यासाठी स्वतः उपस्थित राहून नवीन पायंडा घालून, यापुढे प्रत्येक मुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकेल अशी व्यवस्था करावी, यावेळी 21 मार्च 2023 रोजी पुण्यतिथी साजरी होत आहे, मुख्यमंत्री साहेब आपण उपस्थित राहून आपण ग्रामस्थांच्या भावनेचा आदर राखावा, तसेच समाधी स्थळाच्या विकासासाठी भरघोस निधी टाकावा, समाधी स्थळाच्या आराखड्यासाठी ग्रामस्थ व स्मृती समितीला विचारात घ्यावे, स्वराज्य रक्षक ऐवजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशी नोंद घेण्यात यावी, अशा स्वरूपात लेखी निवेदन व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा झाली, यावेळी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील, अनिलजी काशीद, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ भंडारे, शांताराम काका भंडारे, रामभाऊ सासवडे, हरिभाऊ भंडारे, अनिल भंडारे, राहुल भंडारे,आदी प्रतिनिधी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित होते,

