तुळापूर (तालुका हवेली) येथील श्री खंडोबा देवस्थानची मांजरी बुद्रुक तसेच तुळापूर येथे सुमारे 49 एकर जमीन देवस्थानच्या नावाने असून या जमिनीविषयी मालकीची जोरदार रस्सीखेच श्री खंडोबा देवस्थान तसेच देवस्थानच्या ठिकाणी असणारे पुजारी (होलगुडे)यांच्यामध्ये जोरदार चालू आहे,
याबाबत पुजाऱ्यांच्या वतीने देवस्थानच्या पायथ्याशी धरणे आंदोलन करण्यात आले असून याबाबतचे वृत्त अनेक प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आले होते,
परंतु श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट च्यावतीने अनेक जुन्या कागदपत्रांचा खुलासा करण्यात आला आहे, त्यामुळे या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली असून पुजाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी या जमिनीवर आपला हक्क प्रस्थापित करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे,
श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर घुले, सचिव विश्वास घुले, विश्वस्त रंगनाथ भाऊ शिवले यांनी जुन्या कागदपत्राच्या पुरावेनेशी दिलेल्या माहितीनुसार वास्तविकता 12 व्या शतकामध्ये मांजरी बुद्रुक येथील जमीन श्री खंडोबा देवस्थानला दान म्हणून देण्यात आली होती,
पूर्वीच्या कागदपत्रानुसार सातबारावर श्री खंडोबा देवस्थानचे नाव होते, या जमिनीपासून उत्पन्न मिळावे या उद्देशाने पुजारी यांचा पूर्वज मॅनेजर म्हणून नेमण्यात आला होता,
मॅनेजरच्या सहीने ही जमीन मांजरी बुद्रुक येथील घुले यांना खंडाने देण्यात आली, 1931 सालापासून प्रत्येक वेळी 25 वर्षे कालावधीसाठी रजिस्टर एग्रीमेंटने ही जमीन सुमारे 95 वर्ष झाले खंडाने देण्यात आली होती, ही खूप मोठी अडचण तयार झाली आहे,
कालांतराने या मॅनेजरचे वारस म्हणजे पुजारी यांची नोंद करण्यात आली, त्यांचे नाव सातबारावर आल्यानंतर 2004, 2005, 2007 साली, संबंधित पुजाऱ्यांच्या वतीने रजिस्टर साठे खत, विसर पावती करून वेगवेगळे तीन व्यवहार करण्यात आल्याचे समोर आले आहे,
या प्रकरणांमध्ये देवस्थानच्या नावावर सातबारा असताना या सातबारा मध्ये बदल करून पुढे ही नावे कशी आली व यावर आर्थिक गैरव्यवहार कसे करण्यात आले या गोष्टी आता जुन्या कागदपत्रांच्या आधारे समोर आले असून देवस्थान विकास आराखड्यासाठी तसेच जुन्या रेकॉर्ड प्रमाणे ही जमीन देवस्थानच्या ताब्यात राहण्यासाठी प्रयत्न होणे महत्त्वाचे आहे,
तुळापूर येथील देवस्थानच्या 25 एकर जमिनी पैकी काही क्षेत्रां मधील दाट झाडी असणारे जंगल वृक्षतोड करून नष्ट करण्यात आल्याचे देखील उघड झाले आहे, या अंदाधुंद कारभाराकडे मात्र तुळापूर मधील पदाधिकारी तसेच ग्रामस्थांचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे,
देवस्थानचे पुजारी किसनराव होलगुंडे यांनी सांगितले की, देवस्थानच्या जमिनीवर 2004 ,2005 ,2007 या तीन वर्षात झालेले व्यवहार मला माहिती नाही, मी मुंबईला होतो मी अलीकडच्या काळात गावी आलो आहे, देवस्थानच्या नावाने असणाऱ्या सातबारा वर आलेली पुजाऱ्यांची नावे कशी आली मला माहिती नाही, सद्यस्थितीतील ट्रस्ट रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे, ट्रस्ट आजीवन राहते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला, जमीन विक्रीसाठी मागितलेल्या निविदामध्ये एक जणांचे दहा लाख रुपये जमा आहेत, ही रक्कम ट्रस्टने माघारी का दिले नाही, याचा अर्थ भविष्यात त्याच व्यक्तीबरोबर जमीन विकण्याचा व्यवहार ट्रस्टला करायचा आहे, असा आरोप पुजारी होलगुंडे यांनी केला आहे,
