आज सकाळी ११ च्या सुमारास दुधाने भरलेला टँकर (क्रमांक – एम एच १६ ए इ ४८६६) बारामती डायनामिक्स संकलन केंद्र वडगाव मधून गुनाट मार्गे गोलेगाव या ठिकाणी जात असताना गुनाट येथे अपघात झाला. अपघात झाल्यानंतर टँकर चालक याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले तसेच टँकर मध्ये असलेले सुपरवायझर संतोष फरगडे यांनी बोलताना सांगितले की सदर अपघात हा वळणावर असलेल्या दाट झाडीमुळे रोडवरील ३०ते ४० शेळ्या टँकर ड्रायव्हरला अचानक दिसल्यामुळे टँकर साईट पट्टीच्या पुलाजवळ स्लिप होऊन पलटी झाला तसेच टँकर ड्रायव्हर ला काच फोडून बाहेर काढण्यात आले व रुग्णालयात नेण्यात आले या अपघातामध्ये हजारो लिटर दुधाची नासाडी झालेली आहे गुनाट येथील अपघाती वळणावर असलेल्या साईट पट्टीवरील दाट झुडपे आणि गतिरोधक नसल्यामुळे वाहतुकीचा वेग यामुळे शिरूर -गुनाट -निर्वी रस्त्यावर असे अपघात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे भरधाव येणाऱ्या वाहनांना आळा बसवण्यासाठी तसेच रोड लगत असलेल्या अंगणवाडी शाळेसमोर गतिरोधक तयार करण्याबाबत गुनाट ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण भारत यांच्याकडून बांधकाम विभागाला वारंवार अर्ज देण्यात आले आहे या सर्व घटना टळण्यासाठी गुनाट ग्रामस्थांकडून बांधकाम विभागाला वळणावरील दाट झाडी काढणे आणि गतिरोधक बसवण्याबाबत विनंती करण्यात येत आहे.

