March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
               सध्या ऑनलाइनच्या जमान्या  मध्ये ऑनलाइन चा व्यवहार करणे याकडे लोकांचा कल जास्त असून अजूनही कित्येक लोकांना कर्ज किंवा मुदतठेवी यासाठी आकर्षक सोयी सुविधांचे गाजर दाखवून लोकांना आकर्षित केले जाते, सहकारी बँका तसेच पतसंस्था यामध्ये संचालकांनी दडवलेला काळा पैसा कर्जाच्या माध्यमातून लोकांना वाटला जातो, 

               सध्याची स्थितीत लोकांची आर्थिक परिस्थिती ढासळली असून अगोदरच कोरोना काळामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे थकलेले हप्ते, तसेच नवीन कर्ज प्रकरणासाठी लोकांची धावपळ याचा फायदा कित्येकदा काही वित्त संस्थांकडून घेतला जातो, मग या वित्त संस्था आरबीआयची कनेक्ट आहेत का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे व्यवहारामध्ये पारदर्शकता येण्यासाठी आरबीआयचे रूल्स फॉलो करणे महत्त्वाचे असते, आणि कोट्यावधी रुपयांच्या एफ डी करून संचालक मंडळ सहकारी बँका व पतसंस्था या माध्यमातून लोकांना वेगवेगळी आमिषे दाखवून कर्ज पुरवठा केला जातो, ही एक प्रकारची दिवसा ढवळ्या सावकारकी समाजामध्ये बोकाळलि आहे,

                फक्त स्थावर मालमत्ता तारण ठेवा फाईल अपूर्ण असेल तरी चालेल आम्ही कर्ज देऊ याला लोक बळी पडतात, आणि मग त्या तारण मालमत्तेची जप्ती,निलाव या नावाखाली व्याज, व्याजावर व्याज, दंड, दंडावर व्याज वसूल केले जाते, जरा विचार करा मग हे कर्ज प्रकरण मिटायची कशे, हे सर्व विषय दडवलेल्या काळ्या पैशाच्या माध्यमातून समाजात सध्या जोरदार चालू आहेत यावर शासन कसे नियंत्रण ठेवणार याची चर्चा सध्या लोकांमध्ये जोरदार चालू आहे,