March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
             पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पी.एफ.आयच्या पाकीस्तान धार्जीण्या लोकांकडुन पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या ; या घटनेच्या निषेधार्थ आज रविवार (दि.२५ सप्टेंबर) रोजी  शिक्रापुर येथील चाकण चौकात शिरूर तालुका व शिरूर शहर शिवसेना- युवासेना यांच्या वतीने  जाहीर निषेध करण्यात आला.

     शिवसेना- युवासेनेच्या वतीने आयोजित या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पोपटराव शेलार, महिला संघटक चेतना ढमढेरे, शिरूर शहरप्रमुख सुनिल जाधव, उपतालुकाप्रमुख अमोल हरगुडे,  उपतालुकाप्रमुख अनिल पवार, युवासेना तालुकाप्रमुख विजय लोखंडे, उपतालुकाप्रमुख संतोष भोंडवे, नितीन दरेकर, युवासेना चिटणीस वैभव ढोकले, उपतालुकाप्रमुख राहुल शिंदे, उपविभागप्रमुख नाना गिलबिले, युवासेना उपशहरप्रमुख स्वप्नील रेड्डी,  

उत्तम कान्हुरकर, बाळासाहेब दाते,  योगेश दरेकर, युवासेना शाखाप्रमुख 
नाना भुजबळ ,अतुल विश्वासे ,सचिन मुळे, नितीन मुळे, विकास नरके, आकाश सुर्वे, सुजीत विरोळे, अभि सुर्वे, सत्यवान हरगुडे, अनिल सातकर, वंदना ढमढेरे, संतोष झरे, 
नाना वाबळे, दिनेश जगताप,
राहुल रणधिर, महेंद्र येवले, सुरज काळे, अक्षय पवार, सुरेश आरेवार आदीसह अनेक शिवसैनिक, युवासैनिक व महीला आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.