गेल्या अनेक वर्षापासून चाललेल्या लढ्याला अखेर यश आले आहे, जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने वाटचाल करत असताना वाघोली तसेच आव्हाळवाडी येथे मध्यरात्री सभेचे आयोजन करण्यात आले होते, जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आव्हाळवाडी तसेच वाघोली मधून महिलांचा सहभाग जास्त होता, आपल्या लहान लेकरांना मांडीवर थोपटून मध्यरात्र झाली तरी कडाक्याच्या थंडीमध्ये महिला पुणे नगर महामार्गावर बसून होत्या,
निश्चितच या माय माऊलींचा आशीर्वाद जरांगे यांना मिळाला असून अखेर मराठा आरक्षणासाठी केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केले आहेत, याचे स्वागत आव्हाळवाडी मध्ये एकमेकांना पेढे वाटून ग्रामस्थांनी केले आहे, जरांगे पाटलांच्या प्रकृतीची काळजी असल्याचे यावेळी सर्वांनी बोलून दाखवले, परंतु राज्य सरकारने वेळेत निर्णय घेतल्याने सर्वांना आनंद झाल्याचे देखील त्यांनी बोलून दाखवले,
