March 30, 2026
निपाणी प्रतिनिधी
          श्री विरूपाक्षलिंग  समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांचा  मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्गावर हैदराबाद कडे जाणाऱ्या  गोमांस  वाहतूक करणाऱ्या MH10-T2676 या नंबरच्या वाहनाला निपाणी व हालगा येथील गोरक्षकांनी  डाईल 112 नंबर पोलिसांच्या मदतीने  पकडून बागेवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले

            गुरुवारी  गोमांसची वाहतूक होणार आहे अशी माहिती  समाधी मठाचे प.पू.प्राणलिंग स्वामीजी यांना मिळाली स्वामीजी यांचा मार्गदर्शना नुसार हैदराबाद कडे  गोमांस घेवून  वाहन जाणार आहे या वाहनाला गोसेवा सेवा समिती निपाणी येथील  गोरक्षकांनी सापळा रचून मध्यरात्री बजरंग दल,श्रीराम सेना च्या मदतीने  बागेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

         यावेळी गोरक्षण सेवा समिती निपाणी च्या  कार्यकर्त्यांनी सांगितले की हैदराबादला गोमांस ची  वाहतूक होत असल्याची माहिती श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू.प्राणलिंग स्वामीजी यांना  मिळाली  स्वामीजी यांनी गाडी पकडण्यासाठी विशेष सूचना करून नियोजन सांगितले  त्यापध्दतिने  गोरक्षकांनी गाडीचा पाटलाग  करत डाईल 112पोलिसांच्या मदतीने हिरे बागेवाडी जवळ गोमांस  वाहतूक करणारे वाहन अडवले व चालकासह वाहन ताब्यात घेवून बागेवाडी पोलीसच्या ताब्यात देण्यात आले वाहनातून 12 टन हून अधिक गोमांस जप्त करण्यात आले मालक हा सांगलीच्या आहे असे समजते पर राज्यातून होणाऱ्या गोमांसच्या वाहतुकीचा कार्यकर्त्यांनी निषेध करत अविद्यरित्या कत्तल खाण्यावर बंदी घालावी वाहतूक करणाऱ्या वरही बंदी घालावी अशी मागणी केली पुढील कारवाई पोलीस करत आहेत यावेळी प.पू .प्राणलिंग स्वामीजी म्हणाले की अवेध्यरीत्या  गोमातेची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच बेकदेशीर गोमातेची कत्तल करून हे गोमांस मोठ्या प्रमाणात गोवा, हैदराबाद येथे पाठवले जाते शासन व प्रशशनाने यावर बंदी घालावी व कठोर कारवाई करावी असे आव्हान प.पू.प्राणलिंग स्वामीजी यांनी केले,