यावेळी गरूडझेप अकॅडमीचे संस्थापक प्रा. डॉ. एस. एस. सोनवणे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व अकॅडमीच्या प्रत्येक विद्यार्थ्याची देश सेवेसाठी निवड व्हावी अशी सदिच्छा दिली. यावेळी अकॅडमीचे सुभेदार रमेश मुंडकर, सुभेदार माने सर, घोरपडे सर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी पथ संंचलन केले यावेळी अकॅडमीचे शाखा प्रमुख सुभेदार मेजर तुषार फेंगसे सर, सर्व कर्मचारी, विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.तसेच सायंकाळी सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला, कार्यक्रमात देश भक्ति व पोवाडा व प्रेरणदायी गीत गरूड झेप अकॅडमीच्या विद्यार्थि व विद्यार्थीनीनी सादरीकरण करुन विद्यार्थ्या मध्ये उत्साही वातावरण तयार केले या वेळी अकॅडमीचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
