पुणे जिल्ह्यातील बारामती येथील सर्पमित्र विजय यादव यांना १५ ऑगस्ट रोजी विषारी नागाचा दंश होऊन उपचारादरम्यान चार दिवसांत विजय यादव यांचा मृत्यू झाला, त्यांच दरम्यान मोशी येथील सर्पमित्र नितील शेलकर याला विषारी नागाचा दंश झाला मात्र त्याच्यावर उपचार होऊन तो पूर्णपणे बरा झाला, सदर घटना ताजी असतानाच पुणे जिल्हा वन्यजीव सर्परक्षक असोशियनचे शहराध्यक्ष विनायक मुगडे यास विषारी नागाचा दंश होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या तिघा सर्पमित्रांना सर्पदंश झाल्याच्या घटना ताज्या असतानाच,
शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील नेचर गार्ड ऑर्गनायझेशन संस्थेचे सर्पमित्र गणेश टिळेकर यांना शिक्रापूर येथे साप पकडताना अतिविषारी घोणस जातीच्या सापाचा दंश झाला असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे, मात्र सदर दंश झालेले चारही सर्पमित्र कोणतीही सुरक्षितता न बाळगता साप पकडण्याचे काम करत होते, तर सर्पदंश झालेल्या चौघांपैकी गणेश टिळेकर याला यापूर्वी तीन वेळा सर्पदंश झालेला असून देखील कोणत्याही सुरक्षिततेविना मोठ्या आत्मविश्वासाने साप पकडले आज सर्पमित्राच्या अंगलट आलेले असून अशा सर्पमित्रांवर वनविभाग वचक ठेवणार का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला असून आता तरी वनविभागाने सर्पमित्रांना समाज देऊन सुरक्षितता बाळगण्याबाबत समज देणे गरजेचे आहे.
