March 30, 2026
ब्रेकिंग…! अष्टापुरात बिबट्याचा महिलेवर हल्ला अंजना कोतवाल गंभीर जखमी

ब्रेकिंग…! अष्टापुरात बिबट्याचा महिलेवर हल्ला अंजना कोतवाल गंभीर जखमी

सुनील भंडारे पाटील

पुणे जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस माणसावर बिबट्याचे हल्ले वाढत चालले आहेत, शेती करताना शेतकऱ्यांची जीवन धोकादायक ठरत चालले असून शेतकऱ्यांना बऱ्याचदा मृत्यूशी झुंजावे लागत आहे, हवेली तालुक्यातील अष्टापूर येथे एका बिबट्याने महिलेवर प्राण घातक हल्ला केला आहे,

या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले असून,रयत शेतकरी संघटनेने वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केलेली आहे,

अष्टापुर परिसरातील खोलशेत वस्ती येथे आज पहाटे सुमारे सव्वा पाच वाजता बिबट्याने अंजना वाल्मीक कोतवाल यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेनंतर रयत शेतकरी संघटनेतर्फे वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप दादा कंद, रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रामदास कोतवाल तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल कोतवाल यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

घटनास्थळी शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक बापू पवार यांनी भेट दिली,बिबट्याने हल्ला केलेल्या पिडीत महिला अंजना वाल्मिक कोतवाल यांची विचारपूस केली नातेवाईकांची चर्चा करुन घडलेल्या घटनेची माहिती घेऊन अडचणी समजून घेतल्या.

वन विभागाचे अधिकारी प्रशांत खाडे यांच्याशी चर्चा करू वैद्यकीय मदत मिळून देण्यास सांगितले तसेच उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच DCF महादेव मोहिते यांना फोन करून ताबडतोब पिंजरे वाढवून जास्त पिंजरे व ड्रोन लावणेबाबत व वैद्यकीय मदतीबाबत सूचना दिल्या.

स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाय वाढवावे, तसेच बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक तैनाती करावी, अशी मागणी अष्टापूर ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे,