March 30, 2026
गुनाट एकनाथ थोरात
      निमोणे (ता.शिरूर)  शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ निमोणे आयडॉल्स व्हाॅट्सॲप ग्रुप यांच्या वतीने करण्यात आला . 

आयडॉल्स ग्रुप व निमोने ग्रामस्थ यांच्या माध्यमातून निमोणे नागेश्वर मंदिर येथे कार्यक्रम पार पडला . यावेळी व्यासपीठावर एपीआय शिरूर पोलीस स्टेशन अमोल पन्हाळकर , पीएसआय स्नेहल चरापले , सरपंच संजय काळे, , नागेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे , माजी सरपंच जिजाताई दुर्गे , संतोष काळे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली . यावेळी बोलताना प्रा. गौतम दळवी सर म्हणले आयडॉल्स व्हाॅट्सॲप ग्रुप ची स्थापना २०१५ साली झाली असून हा आगळावेगळा ग्रुप आहे या ग्रुपमध्ये निर्व्यसनी, उच्चशिक्षित आणि समाजसेवेची आवड असणारा चारित्र्यसंपन्न युवकांचा ग्रुप आहे हा ग्रुप सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुककाची थाप आणि पुढील वाटचालीस प्रेरणा मिळण्यासाठी या ग्रुपने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे .आयडॉल्स व्हॉट्ॲप ग्रुप च्या वतीने हा आतापर्यंतचा आठ वर्ष परंपरेगत चालत आलेला सन्मान सोहळा आहे या ग्रुपची प्रेरणा घेऊन अनेक तरुण या ठिकाणी घडले . गुणवत्तापूर्ण शिक्षणातही येथील विद्यार्थ्यांनी यशाचा कळस गाठला आहे . कष्टाची तयारी असली आणि योग्य मार्गदर्शन मिळाले , तर येथील विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करू शकतात ,.तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे एपीआय अमोल पन्हाळकर आणि पीएसआय स्नेहल चरापले यांनी आपले शालेय जीवन आणि पोलीस निरीक्षक पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आणि विद्यार्थ्यांनी प्रयत्नवादी झाले पाहिजे. दहावी व बारावी हा विद्यार्थ्यांचा सुवर्णकाळ आहे असा मोलाचा संदेश त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून सांगितला. आणि या आयडॉल्स व्हाॅट्सॲप ग्रुप च्या वतीने तलाठी पदी निवड झालेले काळे दत्तात्रय भाऊसाहेब, पीएसआय काळे अभिजीत भरत,डॉ.जाधव ऋतुजा नानासाहेब तसेच एमबीबीएस डॉ.काळे ओंकार गणेश, खेलो इंडिया रनिंग जगताप प्रज्वल उत्तम आणि यावेळी गृपच्या वतीने इयत्ता दहावी , बारावी व कला , क्रिडा , स्पर्धा परिक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या ४० विद्यार्थ्याचा पालकां समवेत सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला .यामध्ये  निमोणे आयडॉल्स व्हाॅट्सॲप ग्रुप प्रमुख बाळासो गायकवाड सर, प्रा .गौतम दळवी , शामराव जगताप ,नवनाथ गव्हाणे , रोहीदास काळे , प्रकाश दुर्गे , शिवाजी जाधव , अनिल कांबळे , मच्छिंद्र बांदल , मयुर ओस्तवाल यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले .यावेळी कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक , कार्यकर्ते, महिला वर्ग, निमोने ग्रामस्थ  उपस्थित होते .प्राध्यापक गौतम दळवी यांनी सुत्रसंचालन केले.