शिक्रापूर : प्रा. एन.बी. मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जि. प. प्राथमिक शाळा नं. २ च्या समृद्धी किरण सातपुते व दुर्वा परिक्षित चव्हाण या दोन विद्यार्थीनिंची केंद्रीय नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षेतून निवड झाली आहे.
या विद्यार्थिनींना प्रतिभा नगरे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, केंद्रप्रमुख रामदास विश्वास, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पल्लवी चौधरी, उपाध्यक्ष मयूर मेटे, सदस्य महेश्वरी कोळी, आरती आवाडे, देविदास वाघमारे, मुख्याध्यापक अशोक राऊत यांनी अभिनंदन केले. तसेच शिक्षक वृंद व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थिनी व शिक्षिका यांचा सन्मान केला.


