March 30, 2026
हवेली ज्ञानेश्वर पाटेकर 
            विठ्ठल
नामाचा गजर करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने सासवड कडे
तर जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीने लोणी काळभोर कडे आज सकाळी
प्रस्थान ठेवले.
           

वारीतील सर्वात अवघड असा टप्पा असलेला पुणे ते सासवड हा
टप्पा आहे  दिवेघाट पार केल्यानंतर सासवड या ठिकाणी पालखीचा दोन दिवस
मुक्काम असतो तसेच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा लोणी काळभोर येथे
मुक्काम असतो कोविडच्या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत आषाढी वारी पालखी
सोहळा झाला नाही. मात्र, यावर्षी अत्यंत उत्साहाने राज्यभरातील वारकरी या
भक्तीच्या मेळ्यात सहभागी झाले आहेत. 

        

महाराष्ट्राची ही वैभवशाली परंपरा
अशीच निरंतर कायम राहू दे, अशी प्रार्थना पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी सर्व
वारकरी बांधव करत आहेत.यावेळी पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांचा ठीक
ठिकाणी सन्मान करण्यात आला. तसेच, प्रथमोपचार , फराळ, जीवनावश्यक वस्तुंचे
कीट, छत्री, रेनकोट आदी वाटप पुणे-सोलापूर महामार्गावर करण्यात येत होते
हडपसर येथील गाडीतळावर एकत्र येऊन दोन्ही पालख्या आपापल्या दिशेने यावेळी
मार्गस्थ झाल्या.