March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
           यशाची परंपरा कायम राखत कोरेगाव भीमा, ता . शिरूर येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील यंदाच्या वर्षी १० वीच्या निकालामध्ये मुलींचा डंका वाजला असून शाळेचा निकाल ९४.०७ लागला असल्याचे विद्यालयाचे प्राचार्य माणिक कुंभारकर, प्र. पर्यवेक्षक भगवानराव बेल्हेकर यांनी सांगितले. 

या निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी आनंद व्यक्त करत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. दहावीचा निकाल उत्कृष्ट लागला असून एकूण १४३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहे.

         10 वी मध्ये विद्यालयात आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :
 प्रथम क्रमांक : अश्विनी अभय काटे – ८ ९ .८० टक्के, द्वितीय क्रमांक : वैष्णवी संतोष बारवकर ८८ % टक्के, तृतीय क्रमांक :सिमरन जयउद्दीन शेख ८७.२० टक्के, चतुर्थ क्रमांक : सौरभ राजेश कांबळे – ८६.८० टक्के, पाचवा क्रमांक : दीपक पांडुरंग राऊत ८६.२० टक्के यांनी यश संपादन केलं आहे.