याप्रसंगी कोरेगाव भीमा शैक्षणिक केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर केले, या शाळेच्या वतीने वर्षभरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात,
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना वक्तृत्व कलेमध्ये धाडस निर्माण करण्यासाठी भाषण करण्याची संधी मिळाली, लेझीम, डंबेल, विविध प्रकारच्या कवायती, पिरॅमिड कला सादर करण्यात आली, शाळेच्या परिसरात स्वातंत्र्य दिनाचे सुमारे 100 पेक्षा जास्त फलक लावण्यात आले, मंथन परीक्षेमध्ये प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले,
यावेळी सरपंच विक्रम गव्हाणे पाटील, उपसरपंच शिल्पा फडतरे, संस्थेचे चेअरमन भगवान भंडारे, व्हा चेअरमन मोहिनी फडतरे, मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे / घुटे, संचालक कांतीलाल फडतरे, संजय फडतरे, माऊली आप्पा भंडारे, सचिन भंडारे, मोनिका भंडारे, ज्योती फडतरे, शारदा भंडारे, आनंदा फडतरे, शहाजी फडतरे, आदी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा मेस्तरी, तर स्वप्नाली घावटे यांनी आभार मानले, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली,
