मराठा आरक्षणाचे ध्यास उराशी बाळगून आपल्या जीवनाची, कुटुंबाची परवा न करता मनोज जरांगे पाटील या मराठा युद्धाने 20 जानेवारी ते आज 25 जानेवारी हा सहा दिवसांचा कालावधी दिवस रात्रीचा विचार न करता अखेर मुंबई गाठली, उद्या सकाळी 10:00 वाजता आझाद मैदानावर जरांगे पाटील यांच्या हस्ते गणतंत्र दिनाचे ध्वजारोहण होणार आहे,
मराठा आरक्षणाच्या रस्त्यामध्ये अनेक अडथळे पार करत समुद्रासारखा जनसमुदाय यांचा पाठिंबा व आशीर्वाद घेत जरांगे पाटील यांनी आपले लक्ष गाठले असून अनेक समाजकंटकांनी त्यांच्या कार्यामध्ये अडथळे आणले वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्यक्षात दैवी शक्ती संचारलेल्या या व्यक्तिमत्वाने कसलाही विचार न करता आपले लक्ष गाठले असून अंतरावली सराटी जिल्हा जालना ते मुंबई पर्यंतचा प्रवास अनुभवला असून दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या स्वागतासाठी प्रवासातील प्रत्येक गावामध्ये माता भगिनी आपल्या लहान मुलाला मांडीवर घेऊन रात्रीच्या दोन-तीन वाजेपर्यंत जरांगे पाटील यांची वाट पाहत होत्या, डोळ्यामध्ये अश्रू आणणारा प्रसंग जरांगे पाटील व नागरिकांनी अनुभवला आहे, निश्चितच याचे फळ चांगले मिळणार आहे,
मराठी समाज हा मूळचा शेतकरी असून अन्य धान्य पिकून संपूर्ण जगाला या समाजाने तारले आहे, परंतु समाजाला या गोष्टीचा विसरला पडला असून मराठा समाजाची लढाई ही पूर्णपणे पूर्वीपासून सत्यवादी आहे, परंतु लबाडांच्या राजकारणामुळे मराठी समाजाला कायम सत्व परीक्षा द्यावी लागत आहे, राज्य सरकारचे शिष्टमंडळ सुत्रांच्या माहितीनुसार 3 नवीन जीआर घेऊन जरांगे पाटलांकडे रवाना व 12 मागण्यांचा मसुदा घेऊन आले असून निश्चितच मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी होणार असल्याचा विश्वास जरांगे पाटील यांनी दिला आहे,
अशी माहिती सूत्रांनी दिली आहे, तसेच त्यांच्या माहितीनुसार उद्या 26 जानेवारी गणतंत्र दिनाच्या दिवशी सकाळी 10:00 वाजता आझाद मैदान मुंबई येथे जरांगे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे,