March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
                 सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना राज्य शासनाने मागासवर्गीय तसेच कुणबी समाजाचे सर्वेक्षण तातडीने चालू केली आहे, परंतु त्यासाठी कुशल व्यक्तिमत्व हवे की नाही हा बावळटपणा उघड झाला आहे, केडगाव मध्ये अक्षरशः सर्वे करण्यासाठी नगरपालिकेमध्ये गवंडी काम करणारा माणूस आरक्षणाच्या सर्वेसाठी पाठवल्याचा प्रकार उघड झाला आहे,

                आंधळ दळतंय कुत्र पीठ खाते असा प्रकार घडत असून आरक्षणाची गांभीर्य राज्य सरकारच्या लक्षात आलेले नाही, यापूर्वी सरकारी सर्वच खात्यांमध्ये भरती केलेल्या गरीब व्यक्तींना रोजचे सरावात असणारे काम सोडून अचानक आरक्षण सर्वेच्या कामाकडे वळवल्याने सगळी गडबड होऊ लागली आहे, बिचारे सरळ मार्गी  वयस्कर व्यक्ती जे काही घडले ते डायरेक्ट सांगत आहेत, प्रशासनाचा हा भोंगळ कारभार, बावळटपणा समाजासमोर उघड होत आहे, केडगाव मध्ये असा प्रकार उघडकीस आला असून नगरपालिकेमध्ये गवंडी काम करणारे एक बिचारा थोर माणूस अशा व्यक्तीला आरक्षणाचा सर्वे करण्यास नगरपालिकेचे अधिकारी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे, तसेच लहारे यांनी पाठवले आहे,

                   ज्या कामाचा अनुभव नाही अशी सरळ मार्गी व्यक्ती आरक्षणाचा सर्वे कसा करणार, त्यामुळे अशा गोष्टी समाजात दोन दिवसापासून उघड होत आहेत, लोकांमध्ये या सावळ्या गोंधळाविषयी तर्क वितर्क तसेच जोरदार चर्चा चालू आहे,