March 30, 2026

शिरूर प्रतिनिधी  

         बारामती पंचक्रोशीतील महिलांसाठी वरदान ठरलेल्या महीला शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
आज २६ जानेवारी २०२४ रोजी आपल्या देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिनी बारामती महिला शासकिय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई व इतर आपल्या कर्मचारी समवेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते         

            ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी बारामती महिला शासकिय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई , डॉ. विजय पाटील, महीला शासकीय रुग्णालयातील सर्व महीला व पुरुष कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.महिलांनी या रुग्णालयातील सुविधांचा लाभ घ्यावा,” असे आवाहन या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई यांनी केले आणि सर्वांना ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.