March 30, 2026
ब्रेकिंग…! शिक्रापूर मध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दा फाश
ब्रेकिंग…! शिक्रापूर मध्ये वेश्याव्यवसायाचा परदा फाश
सामाजिक कार्यकर्त्या स्वाती गायकवाड व अर्चना केदार यांनी फेसबुक्र लाइव्ह करत शिक्रापूर येथील शारदा लॉज मधील वैश्या व्यवसाय उघडकीस आणला
पुणे जिल्हा प्रतिनिधी

शिक्रापूर (तालुका) शिरूर गावच्या हद्दीत शारदा लॉजवर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांना मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ छापा मारला , सदर कारवाई मध्ये शारदा लॉजचे चालक संतोष सीना पुजारी वय वर्ष 37 राहणार शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे हा त्याच्या हॉटेलवर एकूण पाच महिलांकडून स्वतःच्या फायद्यासाठी अनैतिक शारीरिक व्यापार करून घेताना मिळून आला,

               म्हणून गुन्हा रजिस्टर क्रमांक 502/२५
, कलम 143 स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4, 5, 6 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून  लॉजचा चालक संतोष पुजारी याला अटक करण्यात आली आहे,
                शिक्रापूर मध्ये पुणे महानगर मार्गा लगत असणाऱ्या शारदा लॉज मध्ये अवैधरित्या वेश्याव्यवसाय चालल्याचे काही महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फेसबुक लाईव्ह करून हा प्रकार उघड केला होता, तसेच डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून तातडीने पोलीस मदत मागवल्या नंतर संबंधित लॉजवर पाच महिला वेश्याव्यवसाय करत असल्याचे उघड झाले, यामधून पीडित महिलांची सुटका करण्यात आली,
              या कारवाई मध्ये शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, राहुल देशमुख ,पोलीस हवालदार पारखे ,पोलीस हवालदार पाटील ,महिला पोलीस कॉन्स्टेबल जोंधळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल कारकूड यांनी नमूद गुन्ह्यात पीडित एकूण पाच महिला यांना मुक्त केले .
                पुढील तपास शिरूर डिव्हिजनचे डी वाय एस पी प्रशांत ढोले , शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख हे करत आहेत,