वाघोली येथील खांदवेनगर येथे अवैध जुगार अड्ड्यावर छापा कारवाई ; गुन्हे शाखा युनिट-६ ची कामगिरी
सुनील भंडारे पाटील
दिनांक 29/07/2025 रोजी गुन्हे शाखा यूनिट -६ कडील सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, प्रशांत कापुरे, सारंग दळे, गिरीश नाणेकर, निलेश साळवे, सुहास तांबेकर, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार असे वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना
गिरीश नाणेकर यांना गुप्त माहिती मिळाली की, सूरज शेजवळ यांच्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये, खांदवेनगर, वाघोली, पुणे या ठिकाणी अवैध मटका/जुगार चालू आहे.
सदर बातमी वरून सदर ठिकाणी अचानकपणे छापा कारवाई केली असता जुगार घेणारे इसम नामे 1) गोविंद राजू राठोड वय 22 वर्षे, 2) शिवप्रसाद गुंडेराव गाडीवाल, वय 26 वर्षे, तसेच खेळणारे इसम नामे 3) प्रकाश पाडप्पा लामझणे, वय 43 वर्षे,
4) बाबुराव ढाकू राठोड वय 49 वर्षे, 5) दीपक धोंडिबा माटे वय 58 वर्षे, 6) भिमप्पा शरणाप्पा कानडे वय 25 वर्षे सर्व रा. वाघोली, पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण 3,935/- रु किं चा मुद्देमाल त्यामध्ये 3900/- रोख व जुगार खेळण्यासाठी लागणारी साधने असा मुद्देमाल मिळून आला असून जप्त करण्यात आला आहे.
तसेच आरोपी क्र.1 व 2 हे सदरचा मटका/जुगार हा त्यांचे मालक *1) चंदू जयराम चव्हाण वय 42 वर्षे रा. इंदिरानगर लोहगाव पुणे व 2) गणेश कालिंदर गलांडे वय ३८ वर्षे रा. वडगाव शेरी, पुणे* यांचे सांगण्यावरून घेत असल्याचे सांगितले आहे. सदर बाबत वरील सर्व आरोपीं विरुद्ध वाघोली पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपासकामी वाघोली पोलीस स्टेशन यांचे स्वाधीन करण्यात आले आहे .
सदरची कामगिरी. निखिल पिंगळे पोलीस उपआयुक्त गुन्हे, सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हे-2 राजेंद्र मुळीक या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, प्रशांत कापुरे, सारंग दळे, गिरीश नाणेकर, निलेश साळवे, सुहास तांबेकर, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार यांचे पथकाने केलेली आहे.
