अशुद्ध पाणी पिल्यामुळे पेरणे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
परिसरातील आठ आरओ प्लांटचे पाणी दूषित असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल
सुनील भंडारे पाटील
पेरणे (तालुका हवेली) या गावांमध्ये काही दिवसापासून गाव तसेच वाड्या वस्त्यांवर व्यावसायिक आर ओ पाणी प्लांट च्या माध्यमातून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले असून गावामध्ये ऐन पावसाळ्याच्या काळात साथीचे आजार बळावल्याने जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र पेरणे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे,
याकडे मात्र ग्रामपंचायतचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे,हवेली तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात असलेले या गाव मध्ये ग्रामस्थांना तसेच नागरिकांना पिण्याचा पाण्याचा शुद्ध पाणीपुरवठा तसेच दैनंदिन वापरासाठी होत असलेल्या पाणीपुरवठ्यासाठी शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आले आहेत,
परंतु याकडे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, पिण्याच्या पाण्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था ग्रामपंचायतीने केलेले नाही, शिवाय गावातील वस्त्यांवर स्थानिक नागरिकांकडून व्यवसाय म्हणून RO प्लांट तयार करण्यात आले आहेत, पुणे जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र तर्फे या पाणी प्लांट वरील पाण्याची चाचणी केली असता सुमारे 8 पाणी प्लांटचे पाणी अशुद्ध असल्याचे निदर्शनास आले,
कारवाई करण्यात आलेल्या पाणी प्लांट धारकांची नावे
१)प्युअर ड्रॉप विराज वाळके
२) जयश्री वॉटर सप्लायर्स रुपेश ठोंबरे
३) देवांश वॉटर सप्लायर्स दीपक ढगे
४) प्रेम राज वॉटर माधुरी वाळके
५) साईशा वॉटर साधना वाळके
६)गावडे वॉटर दत्तात्रय गावडे
७) सिद्धेश्वर वॉटर युनिट २ गणेश वाळके
पुणे जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र पेरणे, वैद्यकीय तज्ञ डॉक्टर प्रज्ञा घोरपडे यांनी सांगितले की, वेगवेगळ्या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढ झाल्यामुळे आम्ही पिण्याचे पाणी तपासणीचा निर्णय घेतला, त्यामध्ये नऊ पाणी प्लांट पैकी आठ प्लांट वरील पाणी अशुद्ध असल्याचे निदर्शनास आले,
ग्रामविकास अधिकारी नाथ यांनी सांगितले की, पाणी तपासणी अहवाल आल्यानंतर 8 प्लांट धारकांना नोटीसा बजावण्यात आली असून पाणी शुद्ध करण्याच्या उपायोजना सांगण्यात आले आहेत, अन्यथा पुढच्या काळात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल
माजी सरपंच निलेश वाळके यांनी सांगितले की, संबंधित पाणी प्लांट मालकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करून ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अन्यथा ग्रामपंचायत व आरोग्य खात्याच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,
