दोन वर्षांसाठी तडीपार असलेला आरोपी जेरबंद ; गुन्हे शाखा यूनिट -६ ची कामगिरी
सुनील भंडारे पाटील
दिनांक 29/07/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट-६ कडील सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, प्रशांत कापुरे, सारंग दळे, गिरीश नाणेकर, निलेश साळवे, नितीन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे असे वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना
नितीन धाडगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून वाघोली पोलीस स्टेशन कडील अभिलेखावरील 2 वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी नामे रोहन उर्फ मोन्या रामप्यारे गिरी, वय 21 वर्षे, रा. 4 नंबर भावडी, रायगड हॉटेल जवळ, वाघोली पुणे
हा सह्याद्री अमृततुल्य हॉटेल जवळ, तांबे नगर, भावडी रोड, वाघोली, पुणे येथे येणार असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ सदर ठिकाणी पोहचून सापळा रचून शिताफीने त्यास ताब्यात घेतले.
वर नमूद आरोपीने मा.पोलीस उप-आयुक्त सो. परि- ०५ पुणे शहर याचे कार्यालयातील तडीपार आदेश क्र. ०५/२०२५, दि. १८/०३/२०२५ जा. क्र. पो.उप. आयुक्त परि. ०४ पुणे शहर नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे दि. २३/०३/२०२५ रोजी पासुन ते २२/०३/२०२७ पर्यंत २ वर्षासाठी पुणे जिल्हयाच्या हद्दीतुन तडीपार केले असल्याची माहिती प्राप्त झाल्याने
तो तडीपार असल्याची आमची खात्री झाली आहे. तसेच त्याने सदर आदेशांचे उल्लंघन केल्याने त्याचे विरुद्ध वाघोली पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
सदरची कामगिरी निखिल पिंगळे पोलीस उपआयुक्त गुन्हे, सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हे-2 राजेंद्र मुळीक यांच्या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, प्रशांत कापुरे, सारंग दळे, गिरीश नाणेकर, नेहा तापकीर, निलेश साळवे, निर्णय लांडे, नितीन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, कीर्ती मांदळे यांचे पथकाने केलेली आहे.
