पुणे जिल्हा प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंतर वाली सराटी या ठिकाणी उपोषण सुरू केले आहे मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे.
आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून मागच्या तीन दिवसापासून त्यांनी पाण्याचा एक थेंब देखील घेतला नाही.त्याच बरोबर उपचार घेण्यासाठी देखील त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे कालपासून त्यांची तब्येत खालावली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून अंतर वाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे. सध्या त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती मिळत आहे.त्यामुळे प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक देखील रविवारी आंदोलन स्थळी दाखल झाले होते. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या या भूमिकेमुळे आता सरकारची अडचणीत वाढ झाली आहे.
