March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
            मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आज मराठा समाजासाठी जीव पणाला लावून आरक्षणाची लढाई लढत आहेत आणि हे बुद्धी हीन सरकार हातावर हात घेऊन बसले आहे. मराठ्यांचा रोष ओढवून घेऊ नका कारण मराठ्यांचा रोष औरंगजेब सारख्या बादशहाला परवडला नाही तुम्ही कुठं आहात मराठा योद्धा माननीय मनोजदादा जरांगे यांना सलाईन तरी भेटली परंतु सरकारला मराठा सलाईन पण नशिबी मिळणार नाही याचे भान सरकारने ठेवावे.

            असेच सरकारची चाल ढकल सुरू राहिली तर सर्व महाराष्ट्रात मराठा आदोलकांकडून मोठा उद्रेक होईल आणि त्याला जबाबदार आणि जबाबदार फक्त हे सरकार असेल आतापर्यंत मराठ्यांना सर्व सरकारांनी फसवले आहे परंतु आता फसवण्याची हिम्मत करू नका कारण कधी नव्हे तो मराठा समाज सर्व गटतट विसरून एकत्र आलाय आणि ही ताकद सरकारला झेपनार नाही व पेलणार ही नाही .

            कदाचित सरकारच्या दुर्लक्षपणा मुळे काही घडल तर सरकारला मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सांगण्या नुसार महाराष्ट्रात श्रीलंके सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास ती परिस्थिती सरकारला झेपणार ही नाही व पेलनार ही नाही व त्या परस्थितीला पुर्णपणे सरकार जबाबदार असेल त्यासाठी सरकारने या गोष्टीचा विचार करून सरसकट सगे-सोयरे अधि सुचनेचा विषय मार्गी लावावा अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.