Homekrushiकृषी विज्ञान केंद्र बारामती येथे शेतकऱ्यांची अभ्यास सहल मोठ्या उत्साहात संपन्न

कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे शेतकऱ्यांची अभ्यास सहल मोठ्या उत्साहात संपन्न

कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे शेतकऱ्यांची अभ्यास सहल मोठ्या उत्साहात संपन्न

सुनील भंडारे पाटील 

२४ फेब्रुवारी २०२६ रोजी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे संस्थेमार्फत शेतकऱ्यांची अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीमध्ये शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी, कोंढापुरी व केंदूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या सहलीचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक व तंत्रज्ञानाधारित शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करणे हा होता. विशेषतः AI आधारित शेती (Artificial Intelligence in Agriculture) या विषयावर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पीक व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, हवामान अंदाज, माती परीक्षण, सिंचन व्यवस्थापन यामध्ये कशी अचूकता व उत्पादनवाढ साध्य करता येते याविषयी माहिती देण्यात आली.

तसेच ड्रोन तंत्रज्ञान, सेन्सर आधारित सिंचन प्रणाली, डिजिटल माती परीक्षण व मोबाईल अॅपद्वारे पीक सल्ला याबाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शंकांचे निरसन करून घेतले.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख झाली असून भविष्यात उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे पदाधिकारी व कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे आभार मानण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते,

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!