मराठा आरक्षण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या दिनांक १० ऑगस्ट वार शनिवार रोजी मराठ्यांची राजधानी सातारा या ठिकाणी होणाऱ्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली आयोजक जिल्हा कोर कमिटीची रॅलीच्या तयारीची आढावा बैठक आज शनिवार दिनांक 3 ऑगस्ट हॉटेल लेकव्यू गोडोली सातारा येथे सर्व जिल्ह्यातील सर्व तालुका प्रतिनिधी मराठा सेवक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली प्रत्येकाने आपले तालुक्याचे नेटके नियोजन उत्कृष्ट प्रकारे केलेले आहे.तसेच जनजागृती साठी ज्या काही ट्रॅक्टर अथवा बाईक रॅली काढायच्या आहेत त्या प्रत्येक तालुक्यामध्ये निघत आहेत.
गरजवंत मराठ्यांच्या मध्ये रॅलीची फार मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली आहे आता जातीवंत मराठे कोणाही लुंग्या सुंग्याचे न ऐकता आपल्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी सातारा रॅली मध्ये दहा तारखेला लाखोंच्या संख्येत समाविष्ट झालेचे दिसतील जे रक्त मराठ्यांच असतं ते आपल्या जातीकडे ओढ घेतल्याने रॅली मध्ये दिसल्या शिवाय राहणार नाही याची पूर्ण खात्री तालुका जिल्हा समन्वय समिती व मराठा सेवकांना आहे रॅली सकाळी ११ वाजता सुरु होईल त्याचा मार्ग तसेच सांगता आणि ठिकाण व इतर नियोजन पुर्ण झाले कि सर्वांपर्यत पोहचऊ असे माध्यमांना सातारा मराठा कोअर कमिटी यांनी सांगितले आहे.
