आज पासुन श्रावण मास प्रारंभ झाला त्या पार्श्वभूमीवर शिव भक्तांनी भगवान शंकरांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केलेली आहे.यवत पासून अवघ्या नऊ किलोमीटरच्या अंतरावरील श्री.क्षेत्र भुलेश्वर देवस्थान अत्यंत नावाजलेले देवस्थान आहे , या ठिकाणी अनेक ठिकाणावरून भाविक दर्शनासाठी येतात , आज श्रावण मास प्रारंभाला सुरुवात मेघराज्याच्या दिवसभराच्या आगमनाने झालेली आहे. अनेक भाविक पुणे, दौड, तसेच आसपासच्या परिसरातून येतात, मंदीर प्रशासनाची आणि पोलीस प्रशासनाच भाविकांन चांगलं सहकार्य होत आहे. तसेच भाविक देखील दर्शन रांगेत उभा राहून प्रशासनाला सहकार्य करत आहे.
मंदिरापासून मोटारसायकल आणि कार पे-पार्किंग एक किलोमिटर अंतरावर केलेली आहे , भाविक पायाऱ्याने दर्शनासाठी चालत मंदिराकडे येतं होते, यात काही वयस्कर,वृद्ध ,ज्येष्ठ नागरिक भाविक देखील दर्शनासाठी येतं होते ,या भविकांना मंदीर प्रशाससाने मंदिरा पर्यंत येण्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी आणि दर्शनासाठी वृध्दांना ज्येष्ठ नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी भाविक करत आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना देखील दर्शनाचा लाभ घेता येईल.
तसेच मंदीर परिसरात भाविकांच्या प्रसादाची व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून आणि भाविकांकडून करण्यात येत आहे तसेच मंदिर परिसरात अनेक खाद्यपदार्थांचे दुकाने थाटलेली आहेत त्या दुकानांमध्ये जाऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद भाविक घेत आहेत, तसेच अनेक धार्मिक ,पूजा पाठाचे वस्तूंची दुकाने , तसेच पेढे, प्रसादाचे दुकाने ,तसेच दररोजच्या वापरातील वस्तूंची दुकाने लागली आहेत.श्रावण मास प्रारंभा मुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजलेला दिसून येत आहे. मंदिर प्रशासनाकडून मंदिर गाभारा सजावट रंगबेरंगी फुलांन पासुन करण्यात आली आहे आणि मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली आहे त्यामुळें भाविकांच्या आकर्षणाचा विषय झाला आहे.
