March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
            अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळ श्रीक्षेत्र वढु बुद्रुक तालुका शिरूर येथे आज मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार गावातील महिलांनी ओवसायला गर्दी केली होती,       

   हिंदुस्थानामध्ये अनेक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने हिंदू धर्माचे सण साजरे केले जातात, सन साजरा करणा मध्ये लोकांची उत्सुकता अगदी शिगेला पोचते, त्यामध्ये दसरा,दिवाळी, गुढीपाडवा, शिवजयंती, गावचा उरूस, आखाडी एकादस, कार्तिकी एकादशी, मोठी चतुर्थी, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, दहीहंडी असे अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, आज मकर संक्रांत, या दिवशी महिला साज शृंगार परिधान करून, महिलांमध्ये एकमेकींना हळदी- कुंकू लावले जाते, गावामधील धार्मिक स्थळे, मंदिरे या ठिकाणी  जाऊन मंदिरात ओवसा वाहून पूजा करून दर्शन घेतले जाते, एकमेकींना ओवसा दिला जातो, अशा पद्धतीने वढू बुद्रुक येथील गावातील सर्व मंदिरे, तसेच धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावर ओवसा पूजन करण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती,

ओवशाचे स्वरूप 
शेतीमधील हुरडा, ज्वारी, उसाचे तुकडे, गावरान बोरे, गव्हाच्या ओंब्या, गाजर, वांगी तुकडे हरबरा गाठे, पांढरे तीळ, पावटे च्या शेंगा, घेवडा शेंग, वालवर,भुईमूग शेंगा,कुंभारी खण, ताट, हळदी कुंकू,