March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
          मराठा आरक्षणा च्या मागणी साठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणी साठी पुन्हा एकदा १० तारखेपासून अंतर वाली सराटी मध्ये उपोषणाला बसले आहेत.

           त्यातच आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.14 तारखेला शांतते मध्ये महाराष्ट्र बंद पाळा, असं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे सकल मराठा समाजाकडून येत्या १४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईतल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनात राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असून त्याचं परिपत्रक ही राज्य सरकारनं काढल होत मात्र त्याची अद्याप पर्यंत अंमल बजावणी झाली नाही, त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे या कायद्याची तात्काळ अंमल बजाणी व्हावी यासाठी येत्या 14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. ते मेसेजेस ही सोशल मिडीया वर सकल मराठा समाजाने व्हायरल केले आहेत.

        कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देऊन ओबीसी तून आरक्षण देण्यासाठी तसंच सगे- सोयरेंचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघाले होते, पण त्यांना मुंबईच्या वेशीवर थांबवण्यात राज्य सरकारला यश आलं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगत त्यांना सरकार चा जीआर दिला. या जीआर ची अंमलबजाणी होत नसल्यामुळे सकल मराठा समाजाकडून १४ तारखेला संपुर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.